Short Biography of Balasaheb Thakare in Marathi
जन्म - 23 जानेवारी 1926
1945 - फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू
1960 - मार्मिक साप्ताहिक सुरू
19 जून 1966 - शिवसेनेची स्थापना, दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन तीव्र
14 ऑगस्ट 1967 - शिवसेनेनं पहिल्यांदा ठाणे महापालिका ताब्यात घेतली
26 मार्च 1968 - शिवसेनेचा मुबंई महापालिकेवर भगवा
1970 - वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार विधानसभेवर
1973 - सुधीर जोशी मुंबईच्या महापौरपदी
1977 - दादरला सेनाभवनाचं उद्घाटन
1986 - पहिल्यांदाच हिंदुत्वाचा मुद्दा मांडला
23 जानेवारी 1989 - शिवसेनेचं मुखपत्र सामना सुरू
1989 - लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप युती
1990 - पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध, शिवसैनिकांनी वानखेडेवर पीच उखडलं
1991 - छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर
1992 - अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा
1995 - विधानसभेवर भगवा, सेना-भाजप सत्तेत मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री
सप्टेंबर 1996 - मीनाताई ठाकरेंचा मृत्यू
1999 - केंद्र सरकारमध्ये सहभाग, 13 व्या लोकसभेत शिवसेनेचे 15 खासदार
जुलै 1999 - निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार बाळासाहेबांना मतदान करायला आणि निवडणूक लढवायला 5 वर्षांची बंदी
2007 - बंदी उठल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा मतदान केलं
2002 ते 2004 - लोकसभेच्या सभापतीपदी शिवसेनेचे मनोहर जोशी
2005 - नारायण राणेंना शिवसेनेनं पक्षातून काढलं
18 डिसेंबर 2005 - राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याची घोषणा केली
29 जानेवारी 2007 - इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हिटलरची प्रशंसा केली
2011 - बाळासाहेबांचा शेवटचा दसरा मेळावा.
A heart touching message on Facebook
आजचा सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरून येईल ...अटकेपार जावून डौलाने
फडफडणारा जरी पटका स्थंबावरून अर्ध्यावर येईल...
आयोध्येतल्या त्या भूमीला धरणीकंपसारखा भास होईल ...
शिवतीर्थावर कान सुन्न होतील ...
तुतारीतून निघणारे सूर
वीणेच्या ब्राम्हनादात विलीन होतील ...
वाघाची डरकाळी ऐकलेले मराठी हृदय आपल्या सम्राटाच्या जाण्याने हमसून
हमसून रडेल ...
बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्राथना !!!
Bookmark Us for latest's news and updates about competitive exams and Government news.