I miss very much my childhood खूप MISS करतोय मी माझ बालपण Marathi Poem
खूप MISS करतोय मी माझ बालपण......!
जेव्हा लहान मुलांना खेळताना उनाडताना पाहतो
सकाळी कट्टी... म्हणत रात्री बट्टी करताना बघतो.
ते खेळ, ते मित्र मैत्रिणी ,किती खेळायचो आम्ही
दिवसाची रात्र कधी व्हायची कळायचे सुद्धा नाही
खूप MISS करतोय मी माझ बालपण ...
खेळताना तर किती भांडायचो आम्ही
तितकेच एकमेकांना जपायचो आम्ही
खेळत जरी असलो तरी अभ्यासही तितकाच करायचो
एकट्याने कुठे अभ्यास होतो म्हणत
चार-पाच जण मिळून करायचो
खूप MISS करतोय मी माझ बालपण....
परीक्षा आली की सार साहित्य जमवायचो
एकाचे पुस्तक तर दुसऱ्याची वही आणायचो
अभ्यास तर काही व्हायचा नाही पण
जमवलेली वह्या-पुस्तक तशीच कोपऱ्यात पडायची
परत मागायला आले कि मग उद्या नक्की देतो
म्हणत आज अभ्यासाला लागायचो
खूप MISS करतोय मी माझ बालपण ...
शाळेत सुद्धा तीच मजा धमाल असायची
कागदाची विमान ,डब्याची अदलाबदली चालायची
प्राथनेला रांगेत ताटकळत उभ राहाण असायचं
शाळा सुटताना घाईने वंदे-मातरम म्हणायचं
काही बाईना सोसायच तर काहींच्या तासांची वाट पाहन
PT चा तास कधी येतोय म्हणत आठवडा घालवण
खूप MISS करतोय मी माझ बालपण ...
मोठ्या बहिणीसोबत daily भांडण करायचो
हुल्लड घालत मग घरभर फिरायचो
बाबाच्या वाढदिवसाला त्याच्याचकडून पैसे घेऊन
आई सोबत गिफ्ट घ्यायला जायचं
संध्याकाळी बाबांनी कितीही नाही म्हंटल तरी केक कापायला लावायचं,
केकवर बऱ्यापैकी तव मारून मग आरामात गिफ्ट द्यायचं
खूप MISS करतोय मी माझ बालपण ...
खूप खूप MISS करतोय मी ते सार काही
मोठे झाल्याचा मोठेपणा नकोय मला
बालपणीच तो गोंधळ हवाय मला
दप्तर घेऊन पुन्हा शाळेत जायचंय
छोट्या - छोट्या गोष्टींसाठी बाबानकडे हट्ट करत खोट-खोट रडायचंय..
खूप MISS करतोय मी माझ बालपण ...
- Pratik Parlikar
No comments:
Post a Comment